Ad will apear here
Next
‘मोदी सरकारच्या कामामुळे व नेतृत्वामुळे भाजपचा विजय’
प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाला,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी २३ मे रोजी केले. निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल आपण जनतेचे आभार मानतो आणि यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले.

दानवे म्हणाले, ‘२०१४च्या निवडणुकीत जनतेसमोर मोदींचे नाव होते व त्यांच्याकडून अपेक्षा होती. या निवडणुकीत जनतेसमोर मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेले काम आणि त्यांचे जागतिक पातळीवर प्रस्थापित झालेले नेतृत्व होते व त्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट झाली. बूथस्तरापर्यंत पक्षाची प्रभावी रचना झाली. त्यामुळे पक्षाला विजय मिळाला. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे काम आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे काम जनतेला पसंत पडले आहे. त्यासोबत भाजपची पक्ष संघटना अधिक बळकट झाली आहे. गेली पाच वर्षे भाजप सातत्याने सर्व निवडणुकांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीतही राज्यात भाजपने जिंकलेल्या जागा व मिळालेली मते या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला.’

‘भाजप–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया–राष्ट्रीय समाज पक्ष–शिवसंग्राम–रयत क्रांती संघटना यांच्या महायुतीने राज्यात एकजुटीने काम केले, त्यामुळे महायुतीला राज्यात जबरदस्त यश मिळाले आहे. आपण भाजपतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानतो. ‘रिपाई’चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या निवडणुकीत महायुतीसाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या व त्याचा लाभ झाला,’ असे दानवे यांनी नमूद केले.

‘निवडणुकीतील जनतेचा आशीर्वाद भाजप नम्रपणे स्वीकारत आहे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नव्या जोमाने काम करेल,’ असे त्यांनी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZOXCA
Similar Posts
‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’ मुंबई : ‘गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केल्याने २०१९मध्ये पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होईल,’ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला
‘प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असून, या कालावधीत भाजपला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल
दानवेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जबरदस्त यशाबद्दल मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language